Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी वासियांना सामाजिक प्रबोधनाची मेजवानी…

तीन दिवस साहित्यिकांचे व्याख्यान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : दि. २५ डिसेंबर,  अहेरी शहर……..स्थानिक यशोधरा महिला मंडळ तसेच रतन दुर्गे यांच्या अध्यक्षतेखालील बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ऐतिहासिक व सामाजिक व्याख्यानांची मेजवानी धम्मदीक्षा भूमी टेकडी, बायपास रोड अहेरी येथे होत आहे.

करिता दिल्लीचे विचारवंत व साहित्यिक डॉ. विलास खरात, नागपूरचे साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 100 तास गाण्याचा विश्वविक्रम करणारे प्रवीण भिवगडे येत्या दिनांक 30 डिसेंबर ते एक जानेवारीला होणाऱ्या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या साक्षीने तीन दिवसीय कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. खास महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन म्हणून शकुंतला सुखदेवे व वनिता कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस विविध खुल्या स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहेत. यामध्ये बहुतेक महिलांनी भाग घेतलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून अरुण मुक्कावार, तहसीलदार बालाजी सोमवंशी, सुधीर भगत, डॉ कन्ना मडावी, सुशीला भगत, विजय सोमकुवर, महेश मडावी, सुनील महातळे, डॉ प्रणय खुणे, अब्दुल जमीर हकीम, ॲड. उदयप्रकाश गलबले, बळवंत रामटेके,डॉ यशवंत दुर्गे , नगराध्यक्ष रोजा करपेत, डॉ नागसेन मेश्राम ,एड. राजेंद्र प्रसाद मेंगनवार , डॉ नीरज खोब्रागडे, मुख्याधिकारी गणेश शहाणे, एड पंकज दहागावकर, भीमराव झाडे, चंद्रप्रकाश कोरडे, भूषण शेकुर्तीवार, एकनाथ चांदेकर, डॉ तिरुपती कर्मे तीन दिवसीय कार्यक्रमात उपस्थित राहतील.
गडअहेरी, आलापल्ली, एटापली, वेलगुर, काटेपल्ली, कोलपल्ली, मर्पल्ली, जीमलगट्टा यांच्यासह विविध गावातील समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे.

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा आयोजनात सहभाग असणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण पहा,

अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी

वैरागड – करपडा मार्गावर ‘हिट ॲण्ड रन’, दोघे जखमी

 

Comments are closed.