पुनः परीक्षा रद्द; चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती शिपाई पदाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क व शिपाई पदाची पदभरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचां सावळागोंधळ चव्हाट्यावर ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क व शिपाई पदाची पदभरती करण्यात येत आहे. सदर पदभरती अंतर्गत शिपाई पदाचा ऑनलाईन पेपर आज होता. मात्र दूरवरून पेपर देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर नोंदणी करून आत प्रवेश केल्यानंतर सदर परीक्षा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचां सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आल्याने परीक्षार्थींना प्रचंड त्रास झाल्याने रोष व्यक्त करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुरवातीलाच सदर परीक्षा रद्द होऊन नव्याने वेळापत्रक ठरवून परीक्षा घेण्यात आली. मात्र ऐनवेळी सबंधित प्रशासनाच्या ढिसाळ नियोजअभावी परीक्षा केंद्रावर पोचलेल्या परीक्षार्थीना माघारी परत यावे लागले आहे. यामुळे सर्व परीक्षार्थिंचे वेळ व पैसा वाया गेल्याने प्रशासनावर रोष व्यक्त करत तांत्रिक कारण समोर केले असले तरी त्याची योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी जनमानसात जोर धरू लागली आहे .
तांत्रिक कारण देऊन परीक्षा रद्द झाल्याने सदर पदभरती हा मोठा घोटाळा तर नाही ना..?अशा प्रश्नांना आता पेव फुटले असून परीक्षार्थीत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात होणाऱ्या विविध पदभरतीत वारंवार आरोप होत असतांनाही यावर शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांची परीक्षेच्या नावाखाली होत असलेली दिशाभूल कधी थांबेल हा एक यक्षप्रश्न आहे.
शिपाई पदासाठी होत असलेल्या आजच्या पेपरकरिता उमेदवारांना स्वजिल्ह्यात परीक्षा केंद्र न देता बाहेर जिल्ह्यात पेपरकरिता केंद्र देण्यात आल्याने परीक्षार्थीना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
Comments are closed.