Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 जुलै : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील 99.95 टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे अभिनंदन. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असेच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित

 ‘अर्थार्जनाचा उपयुक्त पर्याय’ मत्स्य पालन

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.