Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महा अंनिस च्या कार्यकर्त्यांचा पारिवारिक मेळावा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ५ मे : १ मे महाराष्ट्र दिनी संस्कृत संस्कृती लाॅन गडचिरोली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारा शहर शाखा व जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांचा पारिवारिक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक , अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे विश्वस्थ डाॅ.  शिवनाथ कुंभारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक  देवाजी सोनटक्के, प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृती लाॅन चे संचालक तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक सुनीलभाऊ पोरड्डीवार, महा अंनिस चे जिल्हा उपाध्यक्ष  विवेक मून, जिल्हा कार्याध्यक्ष  विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव विलास पारखी, शहर अध्यक्ष  शब्बिर शेख, सर्वोदय मंडळांचे अध्यक्ष प्रा देवानंद कामडी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन करणारे गीत सादर करून करण्यात आले. मा. राऊत साहेब यांनी आपल्या भाषणात लोकांनी केवळ दैववादी न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा. संत महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांची कास धरावी. सावित्रीमाई फुले यांच्या मुळे स्त्रीयांच्या जिवनात अमुलाग्र बदल झाले. परंतु दुर्दैवाने आमच्या शिकल्या सवरल्या माता भगिनी त्याच सावित्रीमाईला समजू शकलेल्या नाहीत आणि ज्यांनी कित्येक शतके स्त्रीयांना जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरूषी वर्चस्वात व मानसिक गुलामीत ठेवले, आज त्यांच्याच विचार सरणीला खतपाणी घालण्याचे काम करतांना पाहून आश्चर्य व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ शिवनाथ कुंभारे साहेब यांनी अंंधश्रद्धेमुळे कुटुंबाचे, समाजाचे व पर्यायाने देशाचे कसे नुकसान हे त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या अनुभवाचे दाखले देऊन विस्तृतपणे मार्गदर्शन केले. व भोंदूगिरी करणाऱ्या बुवा बाबा महाराज व मांत्रिक यांच्या पासून महिला वर्गांनी सावधगिरी बाळगावी व‌ होणाऱ्या शोषणापासून व अत्याचारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे असा मोलाचा संदेश दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विठ्ठलराव कोठारे यांनी सर्व उपस्थित महिला व पुरुष मंडळींना महा अंनिस चे सदस्य होऊन समितीला सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. प्रा विलास पारखी यांनी सापा संबंधित समाजात असलेले समज गैरसमज विस्तृत मार्गदर्शन करून दूर केले व आपल्या परिसरात किंवा घरी साप आढळून आल्यास त्याला न मारता एखाद्या सर्प मित्रांना कळवा तो तुमचेही जीव वाचवेल आणि सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देईल असे आवाहन केले.  महा अंनिस चे सदस्य सौ उषा देवाजी सोनटक्के यांचा जन्म वाढदिवस साजरा करून उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. श्री अरुण भोसले यांनी सहा वर्षीय अंनिस या बालकाच्या मदतीने डोळे बंद करून प्रेक्षकांनी दाखविलेल्या बोटांची संख्या कशी अचूक ओळखतो याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचलन श्री विलास निंबोरकर यांनी तर आभारप्रदर्शन देवाजी सोनटक्के यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम ठाकरे, सुनील नन्नावरे, विठ्ठलराव कोठारे, सुनीलभाऊ पोरड्डीवार, प्रा. विलास पारखी, यांनी परिश्रम घेतले. तर महा अंनिस चे सदस्य सौ उषा आणि देवाजी सोनटक्के या उभयतांनी सर्व उपस्थितांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली. महा अंनिस चे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.