उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी ज्ञान, कला आणि आनंदाचं पर्व – ‘Fly Free Summer Camp 2025’ ला भरघोस प्रतिसाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओम. चुनारकर,
अल्लापल्ली : उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस म्हणजे मुलांच्या आनंदाचे, उत्सुकतेचे आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे दिवस. या पार्श्वभूमीवर डॉ. किशोर नैताम फाउंडेशनच्या वतीने १० मे ते २५ मे २०२५ या कालावधीत ‘Fly Free Summer Camp 2025’ हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अल्लापल्ली येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत दररोज सकाळी ६ ते ११.३० या वेळेत हे शिबिर भरविण्यात येणार आहे.
६ ते १५ वयोगटातील मुलांसाठी हे शिबिर असून त्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक उपक्रमांचा समावेश आहे. फाऊंडेशनच्या वतीने हे शिबिर केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सजवलेले आहे.
काय शिकतील आपल्या चिमुकल्यांना?..
या शिबिरात निसर्गाशी मैत्री करून देणारी भटकंती, ध्यानधारणा व योगासनांचे प्रशिक्षण, झुम्बा आणि अरेबिक डान्स, पारंपरिक खेळ, आदिवासी नृत्य, संगित व चित्रकला, वारली पेटिंगसारख्या पारंपरिक कलेचा परिचय, क्रोशे विणकाम, मृदू कला, गोष्टी सांगणे, नाट्यवाचन, बायोडायव्हर्सिटीवरील सत्रे, बेकरी प्रशिक्षण आणि अगदी AI व सोशल मीडियाची जाणीव अशा विविधरंगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सहभागासाठी अर्ज खुला..
शिबिरासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ असून, डॉ. किशोर नेत्ताम मेमोरिअल हॉस्पिटल, गोंड मोहला येथे फॉर्म मिळतील. ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे:
https://forms.gle/8ykChgwsdZGw794FA
संपर्कासाठी वेळ – सकाळी ११ ते दुपारी २ व फोनवर दुपारी २ ते संध्याकाळी ६ पर्यंत संवाद साधता येईल.
संपर्क क्र :०७१३३-२९९२६२ /९४२२४९८२११ (व्हॉट्सॲप)
एक अनुभव, जो आयुष्यभर लक्षात राहील…
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना केवळ खेळ, गाणी आणि गोष्टी याचा आनंद मिळणार नाही, तर त्यांना स्व-शोध, सामाजिक जाणिवा आणि सर्जनशीलतेचा नवा वाट तयार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून एक स्मरणीय अनुभवाची भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.