Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वतःला ओळखा आणि पुढे जा, यशाची सोनेरी दारे तुमची वाट पाहत आहेत – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

पदव्युत्तर शैक्षणिक विज्ञान विभागातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. १३ जून : विद्यार्थ्यांत्यांच्या निरोपाचा क्षण हा खरोखर फार भावुक असतो. विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी चार टप्यांवर काम करते . प्रवेश देणे,शिकवणे, परिक्षा घेणेआणि निकाल लावणे पण या सगळ्यांमध्ये पाचवा टप्पा आम्ही सुरू केलाय आहे.तो म्हणजे तुमच्या रोजगाराचा. यात आपण सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले,जगातील अशी अनेक लोक असतात जे अपयश पचवून यशस्वी झालेले असतात. अपयश आल्यानंतर आपण यशासाठी किती धडपडतोय, हे महत्वाचे आहे. मला काय व्हायचे आहे, हे स्वतःला समजणे महत्वाचे .जगातील अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला यशापासून दूर नेऊ शकते.आपण काय उद्दिष्ट ठेवतो आणि ते पुर्ण करतो का ,असा स्वतःविषयी विचार करायला हवाय .स्वतःला ओळखा आणि पुढे जा यशाची सोनेरी दारे तुमची वाट बघतेय असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले. पदव्युत्तर शैक्षणिक विज्ञान विभागाच्यावतीने एम.एस्सी.अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि एम .एस्सी पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज आयोजित करण्यात आला होता .त्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,गणित विभाग प्रमुख डॉ. शैलैंद्र देव ,प्रा.डॉ.सुनिल बागडे,प्रा. शिवाजी चेपटे, प्रा.संदीप कागे, आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, समाजाला आपलेही काही देणे लागते या दृष्टीकोनातून आपण काम करावे. चांगल्या कार्यामुळे विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय पातळीवर आमचे विद्यार्थी चमकतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सुनील बागडे आणि डॉ.शैलेंद्र देव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सुरज चौधरी ,नूतन नैताम,ललित आलाम, सायली पायाळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. संपदा पायाळ ,प्रा.रोशन नासरे, प्रा. गणेश ठावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रविण पोडशेट्टीवार आणि आभार जयेश ठाकरे यांनी मानले.

हे देखील वाचा : 

गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर

 

Comments are closed.