Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड एकलव्य निवासी शाळेची प्रवेशपूर्व परीक्षा 5 जून ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.02: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड,जि. गडचिरोली अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी वर्गात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वीचे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्याची शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,जिल्हा परीषद,नगरपालीका,महानगरपालीका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील अनुसूचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षेचे आयोजन दिनांक 5 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळेत करण्यात आले आहे.

इयत्ता 6 वी ते 9 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश फार्म प्रकल्प कार्यालयाद्वारे तपासणी करुन विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. याची यादी परीक्षा केंद्रनिहाय लावण्यात आलेली आहे.सदरची प्रवेशपूर्व परीक्षा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ताडगाव ता.भामरागड जि.गडचिरोली व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कसनसूर ता.एटापल्ली जि.गडचिरोली या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजता हजर राहावे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षिपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा,व इतर शाळांच्या मुख्याध्यापक/शिक्षकांची पालकांची आहे. परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,भामरागड शुभम गुप्ता यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

रक्तदानाने डॉ.गिरीधर काळेंच्या लोकसेवेला युवकांचा सलाम !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.