Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐश्वर्या रॉयने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील जमिनीचा २२ हजारांचा कर थकवला

तहसीलदारांनी नोटीस बजावली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिन्नर 17 जानेवारी :-  थकित अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय – बच्चन सह १२०० अकृषक मालमत्ता धारकांना सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बामगळे यांनी नोटीस बजावल्या आहेत, ऐश्वर्या रॉय यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडी गावाच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमीन असून त्याच्या एका वर्षाच्या करापोटी २१ हजार ९७० रुपयांची थकबाकी आहे. या ठिकाणी ऐश्वर्या राय यांची वीज निर्मिती करणारी पवनचक्की आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुजलॉन कंपनीत अनेक नेते आणि अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.

सिन्नर तहसीलला अकृषक मालमत्ता धारकांकडून वर्षाकाठी १.११ कोटींचा महसूल अपेक्षित असून यापैकी ६५ लाखांची वसुली बाकी आहे. मार्च अखेर पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे. नोटिसीच्या १० दिवसांत थकीत रक्कम भरली जावी, अन्यथा विलंब शुल्क आकारला जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१२०० अकृषक थकबाकीदारांना नोटीसा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

थकबाकीदारांत बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा. लि., मेटकोन इंडिया प्रा. लि., छोटा भाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस. के. शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रा. लि., कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी इंटरप्राइजेस कंपनी गुजरात, रामा हॅडीक्राफ्ट, अल्ग्रो व्हेंचर्स लिमिटेड आदी. कंपन्यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.