Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

….या चित्रपटात कॉमेडी किंग ‘भाऊ कदम’ दिसणार खलनायकच्या भूमिकेत

मराठी सिनेसृष्टीत गेम डाव स्टार्ट' हा नवा चित्रपट पुढील काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता कल्याणमध्ये सुरुवात झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १७ जुलै : कल्याण मधील कशीश इंटरनेशनल हॉटेलमध्ये ‘गेम – डाव  – स्टार्ट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच हॉटेलमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘गॅम डाव स्टार्ट’ या नावानुसार हा चित्रपट म्हणजे जुगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर आधारित असणार आहे. बाकी यात कॉमेडी,एक्शन,ट्विस्ट अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत.

या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत रानादा म्हणजेच हार्दिक जोशी असणार आहे. तर मुख्य नायिकी भूमिका कोण करणार हे गुलदस्त्यात असून  तर खलनायकाची भूमिका भाऊ कदम करीत आहेत. त्याचबरोबर कल्याण मधील भरत सिंग ठाकूर  नवोदित कलाकार देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका करत आहेत. त्यातीलच नितीन रुपणवर हे देखील भाऊ कदम यांच्या समवेत सहखलनायक म्हणून भूमिका साकारणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कल्याण मधील प्रसिद्ध कॉमेडी आर्टिस्ट, गायक बजरंग बादशाह यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. नाथ प्रोडक्शनच्या माध्यमातून हा चित्रपट बनवला जात आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका

…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.