Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर शाहरुखचा ‘पठाण’ रिलीज! पठाण च्या पहिल्याच शो ला तुफान गर्दी

थिएटर्सच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई 25 जानेवारी :- अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण सिनेमा आज अखेर रिलीज झाला आहे. 4.19 लाखांचं अँडवान्स बुकींसह मुंबईसह देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झालेत. शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.  पठाणबद्दल सध्या बरीच चर्चा आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वीच पठाणने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 50 कोटी कमावले आहेत, त्यापैकी पहिल्या दिवशी 23 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.3 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 13.9 कोटी कमावले आहेत. पठाण चा ठिकठिकाणी आज पहिला शो सुरु झालाय. हाऊसफुल गर्दीत शाहरुखच्या पठाण ला प्रेक्षकांनी गर्दी केलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पठाण पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, त्याचप्रमाणे अनेक हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध केला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. मंबईच्या पीवीआर ओबेरॉय थिएटरमध्ये 6-7 पोलीस अधिकारी असून 60 टक्के ऑक्यूपेसीबरोबर पठाणचा पहिला शो सुरू झाला आहे.

पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच 4.19 लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा 45-50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता सिनेअभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झालाय. एकूण 5200 स्क्रिन, विदेशात 2500 स्क्रिन्ससह एकूण 7700 स्क्रिन्स वर्ल्ड वाईल्ड पठाण रिलीज झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.