Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी रोखणार! अभिनेत्री सनी लीओनी…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पॉर्नस्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी बराच काळ सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी आता प्रेक्षकांना तिची फार आतुरतेची वाट पाहावी लागणार नाही, अस समजतंय. कारण सनी लीओनी एका वेगळ्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची झलकही नुकतीच व्हायरल झालेली आहे. सनी लिओनी हिचा आगामी चित्रपट बुलेट्सचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सनीच्या सोबत अभिनेत्री करिश्मा तन्नाही मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात दोघीजणी शस्त्रांचा अवैध पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा उध्वस्त करतांना दिसणार असून यामध्ये पोलिस आणि राजकारण्यांचाही कसा समावेश असतो, हे सुद्धा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

‘बुलेट्स’ हा ॲक्शन चित्रपट असला तरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघीही बोल्ड अवतारात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण मलेशियातील काही सुंदर लोकेशन्सवर करण्यात आलेला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.