Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरावर झालेल्या दगडफेकीनंतर अल्लू अर्जुने सोडलं घर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वादात अडकलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड रविवार 22 डिसेंबर रोजी केली. 4 डिसेंबर रोजी ‘संध्या’ थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा बेशुद्ध झाला होता. त्यावेळी चित्रपट पाहण्यास गेलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या रेवती या महिलेसाठी आंदोलक न्यायाची मागणी करत  उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉइंट ॲक्शन कमिटी (OU-JAC) चे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मुलांसह सध्या त्याचं राहतं घर सोडलं आहे. हैदराबादमधील त्यांच्या घरापासून दूर नेण्यात आले.या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मुलांना त्यांच्या आजोबांच्या घरी सोडलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. तसचे या हल्ल्यतील सहा जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हल्ल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी पश्चिम विभाग, हैदराबाद यांनी सांगितले की, आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.आंदोलकांपैकी एकाने आवारात चढून टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली.आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि रॅम्पवर लावलेल्या काही फुलांच्या भांड्यांचे नुकसान केले.आंदोलकांनी अभिनेत्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच महिलेल्या न्याय देण्याची मागणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.