- येत्या शनिवार 16 पासून लसीकरणाला सुरूवात
गडचिरोली दि १४ जानेवारी :- महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोज आज सकाळी 9 वाजता पोहचले. यावेळी लस वाहतूक करणाऱ्या गाडीचे स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या उपस्थितीत झाले. शनिवार दि.16 जानेवारी पासून जिल्हयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाला शुभारंभ होत आहे.
गेले वर्ष झाले कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात दि.16 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमिवर आज जिल्हयात 6 हजार कर्मचा-यांना पहिल्या व 28 दिवसानंतरच्या दुसऱ्या अशा दोन्ही डोजसाठी 12 हजार डोजेसचा साठा उपलब्ध झाला आहे. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढिल आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे.
आज आलेल्या 12 हजार कोरोना लस आवश्यक तापमानात ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हयात लस घेवून दाखल झालेल्या वाहनाच्या स्वागतावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंभरकर तसेच अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंके, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ.मुकुंद ढबाले, युएनडीपीचे सल्लागार विनोद देशमुख, लसीकरण अधिकारी डॉ.समिर बनसोडे, डॉ.अनुपम महेश गौरी उपसिथत होते.
Comments are closed.