Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांनी पीपीटी किट लावून केली कोविड वार्डाची पाहणी

जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्ह्यातील कोविड स्थितीचा व सोयी- सुविधांचा घेतला आढावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मे : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज दि. 23 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन पीपीटी किट लावून कोविड केअर वार्डाची पाहणी केली व तेथील सोयी -सुविधा बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी कोरोना बाधीत रुग्णांशी चर्चा करून उपचार व रुग्णालयातील सोयी-सुविधा बाबत विचारपूस केली. यावेळी खा. अशोक नेते यांच्या समवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे, डॉ सोळंकी यांनी स्वतः पीपीटी किट लावून सर्व वार्डात जाऊन पाहणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर खा. अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सभागृहात प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोविड स्थितीचा व सोयी-सुविधा यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, न.पं.उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, कोविड केअर वार्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सोळंकी, डॉ धुर्वे व अन्य सर्व प्रमुख आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड स्थितीची संपूर्ण माहिती जाणून घेतली व ऑक्सिजन सिलेंडर, वैक्सीन, व्हेंटिलेटर, रेमडीसिवीर इंजेक्शन व इतर औषधोपचार साहित्य व औषधांच्या पुरवठ्याबाबत माहिती जाणून घेतली व औषधी जिल्ह्यातील बाराही तालुक्यात वेळेवर पुरवठा करून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्याचे निर्देश दिले. तसेच कोरोना या महाभयंकर आजाराबाबत जिल्ह्यातील दुर्गम भागात जनजागृती करून रुग्णांवर वेळीच उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णांना चांगली वागणूक मिळण्यासाठी परिचारीकांना तसे निर्देश देऊन चांगली आरोग्य सेवा देण्याच्या सूचना केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच कोरोना बाधीत रुग्णाशिवाय इतर रुग्णाकडे दुर्लक्ष करू नका त्यांनाही योग्य आरोग्य सेवा देऊन नागरिकांमध्ये लसीकरण बाबत जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी कोरोना वार्डाची स्थिती बाबत प्रत्यक्ष माहीती जानण्यासाठी खा. अशोक नेते यांनी वैद्यकीय अधिकारी समवेत स्वतः पीपीटी किट लावून कोविड वार्डात जाऊन पाहणी केली व कोरोना बाधीत रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व उपचार व सोयी सुविधा बाबत विचारणा केली व रुग्णांना चांगली वागणूक देऊन योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.

हे देखील वाचा :

धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता

 

 

Comments are closed.