चातगाव येथील ” सर्च ” रुग्णालयात ०९ जानेवारीला मेंदूविकार व एपिलेप्सी (मिर्गी) ओपीडी
मोफत ईईजी तपासणी व औषधोपचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : समाजामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) यासारखे मेंदूविकार अकस्मात होणार्या मृत्यूसाठी करणीभूत ठरत आहेत. आता सर्च रुग्णालयात नागपुर येथील मेंदूविकार तज्ञांद्वारे तपासणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. मेंदूविकार ओपीडी प्रत्येक महिन्याच्या दुसर्या गुरुवारला दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी नियोजित असून त्याकरिता नागपुरचे मेंदूविकारतज्ञ डॉ.धृव बत्रा तपासणी करिता येणार आहेत.
मेंदूविकार ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, एपिलेप्सी, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार मिळणार आहे. गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरुजू रुग्णांना मोफत औषधी दिल्या जातील. मेंदूविकार ओपीडीमध्ये एपिलेप्सी (मिर्गी) आजाराच्या रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. एपिलेप्सी (मिर्गी) रुग्णांसाठी विशेष सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने आता रुग्णालयातर्फे रुग्णांना मोफत औषधोपचार व ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम) तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे एपिलेप्सी ग्रस्त रुग्णांना नियमित तपासणी आणि उपचारासाठी होणाऱ्या खर्चाचा मोठा भार कमी करता येईल.
एपिलेप्सी उपचारांअभावी अनेक रुग्णांचे जीवनमान खालावते, सर्च रुग्णालयात विशेष तपासणी सुविधा सुरू झाल्याने अनेक रुग्णांची अवस्था सुधारेल तसेच समाजात एपिलेप्सीबद्दल असलेल्या गैरसमजांना आळा बसेल. झटका येणे, शरीराच्या कोणत्याही भागात अचानक हालचाल होणे, शरीर कठोर होणे आणि थरथरणे. फक्त एका भागात हालचाल एक हात, पाय किंवा चेहऱ्याच्या भागात हालचाल होणे, मांसपेशींचे अचानक आकुंचन, झटक्यांसारख्या वेदनारहित हालचाली, शरीर पूर्णतः स्थिर होणे अचानक स्नायूंमध्ये शक्ती नसणे आणि पडणे. झटक्यानंतर स्मृतीभ्रंश किंवा विस्मृती होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या रुग्णांना एपिलेप्सी औषधी या १००% मोफत दिल्या जातात तसेच ईईजी तपासणी मोफत दरात करण्यात येते. दिनांक- ०९ जानेवारीला सर्च रुग्णालयात येऊन जास्तीत जास्त रुग्णांनी ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालया तर्फे करण्यात येत आहे.
हे ही वाचा,
स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?
‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;
Comments are closed.