Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागेपल्ली सेवा सदन रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचे शुभारंभ!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आलापल्ली:- शहरालगत असलेल्या सेवा सदन रुग्णालय नागेपल्लीत  आज कोरोना लसीकरण केंद्राचे शुभारंभ नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. लसीकरण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी,आणि आलापली येथे ग्रामीण रुग्णालय मोदुमाडगु या ठिकाणी प्रचंड गर्दी निर्माण होत होती .त्यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती .शेवटी स्थानिक अंतर आणि वयस्कांची अडचण बघून सेवा सदन रुग्णालय या ठिकाणी लसीकरण केंद्र ठरविण्यात आले असून सर्वांनी लस घेण्याची सूचना करण्यात आले .शासनाने ठरविलेल्या 45 वर्षीय वरील सर्व ग्रामस्थांनी कोरोना ची लस घेण्याचे आवाहन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी उपसरपंच रमेश शानगोंडावार ग्राम पंचायत सदस्य मल्लारेड्डी येमनुरवार ,राहुल जगन्नाथ सिडाम .गावातील प्रतीष्टित नागरिक कांचनलाल वासनिक, विशाल रापेल्लिवार ,सारंग सवरंगपते, ग्रा. प. सदस्या लक्ष्मी सिडाम, ग्रा. प. सदस्या ज्योती ठाकरे ,ग्रा. प. सदस्या स्मिता नीमसरकार आदींची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.