Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात घेतली आढावा सभा.

आरोग्यसेवेत बेजबाबदारपणा कदापि खपवून घेणार नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : दि. ०३ डिसेंबर रोजी नागपूर मंडळाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर  गडचिरोली जिल्ह्यात दौरा करून तसेच आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष  भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह धानोरा ग्रामीण रुग्णालयास  भेट दिली व तेथील डॉक्टरांशी चर्चा  करून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच  धानोरा तालुक्यात कारवाफा व आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा करून आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्या  दरम्यान आरोग्यसेवेत कोणतेही डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी त्यांनी दिली.

आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवजात शिशू देखभाल कक्ष, प्रसूतिपश्चात कक्ष, नवजात बालक आगमन कक्ष, जिल्हा शीघ्र प्रतिसाद कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, बालरोग कक्ष अशा विविध कक्षांत फिरून  प्रत्यक्ष पाहणी केली.    पाहणीचे वेळी  केली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत आखाडे व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.तसेच  महिला रुग्णालयालगतच्या  वाढीव खाटांच्या रुग्णालय इमारतीचे कामाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालय इमारतीचे काम विहीत वेळेत पूर्ण होणे करिता  गतीने काम  करण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदारांना त्यांनी दिल्या. तसेच फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिटची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. शंभरकर यांनी यावेळी दिल्या  असून  शहरी व ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

Comments are closed.