Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम भागात ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप आणि कोरोनाबाबत जनजागृती

जनसंघर्ष समितीच्या वतीने भामरागड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आज सर्वत्र कोरोना महामारी ने हाहाकार माजुन ठेवलाय त्यात शहरा सोबतच गावात सुद्धा याचा प्रसार झपाट्याने झाला. शहरातील वैदकीय सुविधा या बिमारीस हाताळण्यास कुठे तरी कमी पडली त्या आधीच भारतीय सरकारने त्या रोगावर उपायकारक लस शोधली परंतु लोकांच्या मनात  भिती निर्माण करण्यात आली.

शहरानजिक असलेल्या गावात आज आपल्याला जनजागृति करावं लागत आहे तर भामरागड सारख्या दुर्गम भागात काय अवस्था असेल लोकांच्या लसीकरणा बाबत मनात वाटेल तसे संभ्रम  निर्माण करण्यात आले. कोणी म्हणत की, लस घेतल्याने माणूस मरतो तर कोणी स्त्री गरोदर होणार नाही, लस घेतल्याने नपुंसकता निर्माण होते. अशी काही भिती तिथल्या लोकांच्या मनात ठासुन भरली आहे ही वेळ आपल्या देशा सोबत लोकांची हिंमत वाढण्याची आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या देशातील लोकांना लस उपलब्ध होत आहे. परंतु ती घ्यायला कोणी तयार नाही लसीकरण केंद्रावर आलेली लस परत जात आहे.

दुर्गम भाग असलेल्या गावात आज लोकांना घरातून बोलुन लस द्यावी लागत आहे. यासाठी तेथील वैद्यकीय यंत्रणा व पोलीस दल काम करत आहे. दुर्गम भागातील गावात पोहचून त्यांना लसीच महत्व पटून सांगत आहे. स्वतःच उदाहरण आदिवासी बांधवा समोर ठेऊन हिम्मत वाढवण्याच काम करते आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एव्हढे सर्व कशासाठी तर फक्त आदिवासी भागातील लोकांसाठी त्यांचा प्रकुतीसाठी कारण त्यांना माहीत आहे. आदिवासी भागात जर करोनाने शिरकाव केला तर पाहिजे तश्या सुविधा उपलब्ध नाही, दवाखान्यात जायचं म्हटल की रस्त्याची पाहिजे तशी अवस्था नाहीं, दवाखान्यात पोहचायच्या अगोदर माणूस दगावण्याची शक्यता जास्त याचच महत्व म्हणून जनसंघर्ष समितीच्या वतीने भामरागड भागातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडून प्राप्त ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप डॉ. संदीप आकरे व डॉ श्रुती आकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यात प्रामुख्याने डॉ मिलिंद मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ सचिन विभूते, ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी,  डॉ. वानखेडे, दत्ताजी शिर्के, अध्यक्ष, जन संघर्ष समिती, जगदीश वानोडे, महेश ढोबळे उपस्थितीत होते.

हे देखील वाचा :

मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

 

Comments are closed.