Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकार शक्ती, मुलांसाठी फायदेशीर…..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

Heath tips: सध्या भाजी मार्केटमध्ये आंबट-गोड चवीचे फ्रेश आवळे विक्रीसाठी दिसून येत आहेत. आवळा आपल्या बहुगुणी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तज्ज्ञ हिवाळ्यात आवळा खाण्याचा सल्ला देतात.

अशा स्थितीत बदलत्या हवामानासोबत रोगप्रतिकारक शक्तीही बदलते. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा परिस्थितीत थंड हंगामात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगांपासून संरक्षण होईल, असे तज्ज्ञ सांगतात.

अनेक आजारांवर फायदेशीर…
आवळा हा आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, कॅरोटिन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गुणांनी समृद्ध स्रोत असलेल्या आवळ्याचा समावेश आहारात करणे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत…
पचनक्रिया सुधारणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच त्वचा व केसांसाठी फायदेशीर असणारा आवळा मधुमेह, हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो.

मुलांसाठी फायदेशीर…
हिवाळ्यात हे मुलांना संसर्गापासून वाचवते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्त्ती वाढवते. आजारांपासून दूर ठेवण्याचा हा देशी उपाय आहे. मुलांसाठी आवळा असा फायदेशीर आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.