Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्योजक तुषार राऊळ यांच्याकडून जिजाऊ कोविड सेंटरला ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोविड रुग्णांना वेळेवर उपचार होण्यास शासनाचे कोविड केअर सेंटर व रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने कोरोना रुग्णांची धावाधाव होत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांकरिता बेड्स मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

याचीच दखल घेत विक्रमगड (झडपोली) येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भावना भगवान सांबरे यांनी जिजाऊ संस्थेची भव्य दिव्य व सर्व सोयी व सुविधेने परिपूर्ण असलेली शाळेची इमारत ही कोविड रुग्णांच्या सेवेसाठी देऊन त्या ठिकाणी “महाराष्ट्र दिनी” (दि.१ मे) १०० बेडचे “कोविड केअर सेंटर” सुरू करून ‘आदर्श’ निर्माण करून दिला..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच विक्रमगड (झडपोली) येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत जिजाऊ कोविड केअर सेंटरमधील (CCC) कोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी या सेंटरला आता ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator Machine) उद्योजक तुषार राऊळ यांनी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे.

पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या सेंटरमुळे अनेक रुग्णालयांवरचा ताण कमी होऊन रुग्णांना योग्य सेवा, सुविधा प्राप्त होणे शक्य झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यातच, ग्रामीण भागातील रुग्णांचे प्राण वाचविणे व ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णांना जीव गमावू नये याकरिता जिजाऊ संस्थेचे संचालक तथा मुंबई स्थित सुप्रसिद्ध उद्योजक तुषार राऊळ यांनी झडपोली येथील भगवान महादेव सांबरे रुग्णालयाला तब्बल ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator Machine) सुपूर्द केल्या.

या मशिन्सचा वापर जिजाऊ कोविड केअर सेंटर (CCC) येथे करण्यात येणार असून जेणेकरून गंभीर व ऑक्सिजनची तातडीने गरज असणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवणे डॉक्टरांना शक्य होणार आहे.

यावेळी विक्रमगडचे नगराध्यक्ष रवींद्र खुताडे, संस्थेचे जावेद खान, जितेंद्र वाघ व डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

“ऑक्सिजन अभावी होणारी जिवीतहानी लक्षात घेता भविष्यातील संभाव्य परिस्थिती आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिजाऊ कोविड सेंटरमध्ये लवकरच ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत तसेच  या कोविड केअर सेंटरची क्षमता १००० बेडची आहे.”

निलेश सांबरे – संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.