Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह १११ नवीन कोरोना बाधित तर ६८ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,दि. ४ एप्रिल: जिल्हयात आज  १११ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ६८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०९७७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०२६८ वर पोहचली. तसेच सद्या ५७६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ११५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये आलापल्ली येथील ६० वर्षीय महिलेचा तर दुसऱ्या मृत व्यक्ति मध्ये गडचिरोली येथील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ५.२५ टक्के तर मृत्यू दर १.०५ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

          नवीन १११ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ४६, अहेरी १०, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील २०,  चामोर्शी ८, धानोरा तालुक्यातील १, कोरची २, कुरखेडा ३,  मुलचेरा १, सिरोंचा ३, तर वडसा तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ६८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ४२, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा १, एटापल्ली १, सिरोंचा १,  कुरखेडा ३,  तर वडसा मधील ४ जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव १०, शिवाजीनगर १, कारगिर चौक १,  ओमनगर १, लांजेडा ६, त्रिमुर्ती चौक १, कॉम्पलेक्स २, रामनगर २, झेडपी क्वॉर्टर १, जेप्रा १, चामोर्शी रोड २, वसा २, गोकुलनगर २, गोगांव १, आंबेशिवनी १, शाहुनगर १, मेडिकल कॉलनी २, आशिर्वादनगर १, सिआरपीएफ कॅम्प १, होंडा शोरुमजवळ १, लक्ष्मीनगर १,  हनुमान वार्ड १, स्थानिक १, राजगट्टा १, बोदली १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली ४, आलापल्ली ३, स्थानिक २, महागांव १,  आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ३, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये भवानीपूर १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक ३, घारगांव १, रेगडी ३, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, पोलीस कॅम्प कोटगुल १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १३, एलबीपी हेमलकसा ६, झारेगुडा १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये सुधागुडम १, नेमाडा २, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एम जी विद्यालय १, स्थानिक ४, गांधी वार्ड १, सिंधी कॉलनी १,  कुरुड ३, आमगांव ४, विसोरा १, तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.