Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 14 मृत्यूसह आज 504 कोरोनामुक्त तर 427 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 09: आज जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 504 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25445 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 20735 वर पोहचली. तसेच सद्या 4168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 542 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 14 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 39 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथील 64 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.49 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.38 टक्के तर मृत्यू दर 2.13 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Gad corona

नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 131, अहेरी तालुक्यातील 35, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 44, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 25, कोरची तालुक्यातील 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 35 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 35 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 504 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 37,  आरमोरी 45, भामरागड 7, चामोर्शी 51, धानोरा 21, एटापल्ली 46, मुलचेरा 15, सिरोंचा 36, कोरची 6, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 33 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा

वर्धा वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ

Comments are closed.