Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 11 जून : आज जिल्हयात 16 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29845 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28736 वर पोहचली. तसेच सद्या 376 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 733 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नविन मृत्यू मध्ये 70 वर्षीय महिल ता. मुलचेरा, 55 वर्षीय पुरुष कुरुड ता.वडसा, यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.28 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.26 टक्के तर मृत्यू दर 2.46 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 16 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 5, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 05, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे.

corona sheet

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 69 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 14, अहेरी 05,  आरमोरी 03, भामरागड 02, चामोर्शी 15, धानोरा 06, एटापल्ली 01, मुलचेरा 15, सिरोंचा 05, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 03 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या दुकानावर संतप्त नागरिकांनी केली दगडफेक

धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून

 

Comments are closed.