Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत आज नवीन 182 कोरोनाबाधित तर 220 जणांनी केली कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 27 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 491 कोरोना तपासण्यांपैकी 182 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 220 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33889 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31839 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1297 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.83 टक्के तर मृत्यू दर 2.22 टक्के झाला आहे.

आज नवीन 182 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 98, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 45, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 19, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 07 आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 220 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 87, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 14, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 07, सिरोंचा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 25,आणि वडसा तालुक्यातील 24 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.