Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा हे घरगुती उपाय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड कोणते आहेत ते.

रताळे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर ऑक्सिजनचे स्रोत देखील आहे. आपल्या नियमित आणि संतुलित आहारामध्ये त्याचा समावेश असणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लसूण

लसूणच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. तसेच लसणाचे सेवन केल्याने सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते.

लिंबू

लिंबाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. विशेष म्हणजे लिंबाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. यामुळे दिवसातून कमीत-कमी दोन वेळा तरी लिंबाचे सेवन केले पाहिजे.

केळी

केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. तसेच केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत.

किवी

किवी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवी ऑक्सिजन वाढविण्यात देखील मदत करते. म्हणजेच यात व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात आहे. या करोनाच्या काळात डॉक्टर लोकांना जास्त व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देत आहेत.

दही

दहीदहीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असतात. हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, दह्याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता दूर होते. दह्यामुळे ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास मदत होते.

Comments are closed.