Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पिंपळगाव येथील दारूविक्रेत्यांना नोटीस 

0

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.२४ : देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला, पुरुष ,युवक, युवतींनी शक्तिप्रदर्शन करीत अवैध दारूविक्री विरोधात संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. सोबतच गावातील विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांची भूमिका, विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी गावकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती लोकांना व्हावी तसेच अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट व्हावे, याकरिता मुक्तीपथ तर्फे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष, युवक, युवतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित अवैध दारूविक्रेत्यांविरोधात संघर्ष करण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर सभेचे आयोजन करून  मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, सचिव, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच गावातील अवैध दारूविक्रीची समस्या लक्षात घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व दारूविक्री बंदीसाठी करावयाच्या उपाययोजना मुक्तिपथ तालुका टीमने सुचविले. त्यानंतर गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसरपंच, पोलीस पाटील, पेसा मोबीलेझर, मुक्तिपथ टीम  यांनी मिळून गावातील दारू विक्रेतांना नोटीस दिली आणि गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची तंबी देण्यात आली. दारू विक्री केल्यास पाच हजार रुपये पहिला दंड भरावा लागेल अशी ताकीद सुद्धा देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,
https://loksparsh.com/top-news/naxal-leader-giridhars-wife-sangeeta-surrenders-in-presence-of-deputy-chief-minister-devendra-fadnavis/41638/
https://loksparsh.com/maharashtra/people-with-disabilities-should-come-forward-to-take-advantage-of-government-schemes-ayushi-singh/41627/
https://loksparsh.com/education/appeal-to-take-advantage-of-gnyanjyoti-savitribai-phule-aadhar-yojana/41624/

Leave A Reply

Your email address will not be published.