Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘सर्च’ रुग्णालयात २७ नोव्हेंबरला श्वसनविकार व कान नाक घसा आरोग्य तपासणी शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :  चातगाव येथील सर्च रुग्णालयात  दर महिनाच्या चौथ्या बुधवारला दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी  श्वसनविकार  व कान, नाक, घसा आरोग्य तपासणी विषयक ओपीडीचे  आयोजन करण्यात आले आहे.सदर ओपीडी  करिता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, (वर्धा ) येथील विशेषज्ञ डॉक्टर तपासणी करिता येणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 सिगारेट मुळे झालेले श्वसन विकार, दमा (अस्थमा), क्षयरोगा नंतर होणारे फुफ्फुस विकार तसेच कोरोना मुळे उद्भवलेले फुफ्फुसाचे  विकार, लहान मुलांना  ॲलर्जी मुळे होणारे श्वसन विकार इत्यादी  आजाराची तपासणी करण्यात येणार आहे.  तसेच श्वसनाच्या समस्यां जसे  घशात घरघर असेल .   वारंवार छातीत दुखत असेल तर ते श्वसनाच्या समस्येचे कारण असू  शकते. खोकताना किंवा श्वास घेताना छातीत दुखते असे वाटत असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला श्वासोच्छवासाच्या समस्येची लक्षणे असतील जसे की नीट श्वास घेता येत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला श्वसनाचा आजार असू शकतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खोकल्यातून रक्त येत असेल तर  फुफ्फुसाचा विकार किंवा श्वसनाचे  लक्षण आहे. रक्त वरच्या श्वसनमार्गातून किंवा तुमच्या फुफ्फुसातून असू शकते. जुनाट खोकला असेल तर तुम्हाला श्वसनाचा त्रास आहे.  जास्त प्रमाणात ठसा येत असेल तेव्हा फुफ्फुसाचा आजार असू शकतो. वरील पैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्हाला कदाचित फुफ्फुसाचा संसर्ग किंवा श्वसनाचा आजार आहे. श्वसन विकार ओपीडी मध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल.
 घश्यातील टॉन्सिल वाढणे, नाकातील मास वाढणे, नाकाचे हाड वाढणे, वारंवार कान फुटणे, कांनातून पस/पू निघणे, नाकाचे हाड वाकडे होणे, गलगंडाचा त्रास होणे, थॉयरोइडची गाठ वाढणे, तीव्र घसा खवखवणे हि  लक्षणे असल्यास कान, नाक, घसा ओपीडी मध्ये मोफत आरोग्य तपासणी करणात येईल. गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. श्वसन विकार आणि कान  नाक घसा ओपीडी ही दर महिन्याच्या चौथ्या बुधवारला नियोजित असून दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी जास्तीत जास्त रुग्णांनी  सर्च रुग्णालयात येऊन आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, ओपीडीमध्ये  ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

Comments are closed.