Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 151 नव्याने पॉझिटीव्ह,एकही बाधिताचा मृत्यू नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • जिल्ह्यात आतापर्यंत 13692 बाधित झाले बरे.
  • उपचार घेत असलेले बाधित 2713.
  • जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16654

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर डेस्क, दि. 6 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 151 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 151 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 654 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 119 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 692 झाली आहे. सध्या 2 हजार 713 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 24 हजार 745 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 6 हजार 589 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 249 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 233, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 151 बाधितांमध्ये 85 पुरुष व 66 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 49, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील आठ, मुल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील 19, नागभिड तालुक्यातील एक, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील 25, राजुरा तालुक्यातील तीन तर नागपूर,यवतमाळ व गोंदीया येथील प्रत्येकी एक असे एकूण 151 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील घुग्घुस, ऊर्जानगर, जीएमसी परिसर, जलनगर, तुकूम, रामनगर, पठाणपुरा वार्ड, जटपुरा गेट परिसर, बाबुपेठ, वडगाव, अंचलेश्वर गेट परिसर, दादमहल, महाकाली कॉलरी, पडोली, बगड खिडकी, भिवापूर वार्ड, गजानन महाराज मंदिर परिसर, लालपेठ, पठाणपुरा, विठोबा खिडकी, बिनबा गेट भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

तालुक्यातून याठिकाणी आढळले बाधित:

पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा भागातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील मौलाना आजाद वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.चिमूर तालुक्यातील नेहरू वार्ड, ठक्कर वार्ड, जवार बोडी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 15 परिसरातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठल वाडा परिसर, भंगाराम तळोधी भागातून बाधित ठरले आहे. जिवती तालुक्यातील नोकारी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, आवारपुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सम्राट अशोक चौक, विद्यानगर, चांदली, शांतीनगर, गुरुदेव नगर, गुजरी वार्ड, टिळक नगर, उदापूर, चिचखेडा, रेणुका माता चौक परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील जनकापूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी, माता मंदिर वार्ड, राजीव गांधी वार्ड, बोर्डा, टेंमुर्डा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील आनंदनगर सुमठाणा, माजरी, नेताजी नगर, विजासन परिसर, शिवाजीनगर, गौतम नगर, सावरी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील कडोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, नवरगाव, गांधी चौक भागातुन बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील गौरी कॉलनी परिसर, भारत चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.