Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शंभर दिवसांचा कार्यकाळ हा आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा प्रभावी आहे – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जळगाव 7 ऑक्टोबर :-   आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा फडणवीस शिंदे सरकारचा शंभर दिवसाचा कार्यकाळ हा अधिक प्रभावी असल्याचे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. शंभर दिवसात राज्य सरकारने गोरगरिबांच्या हिताच्या योजना तसेच पाणी व कृषी विभागाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम या सरकारने केले असून केंद्र सरकारही राज्य सरकारला मदत करत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 40 आमदार 12 खासदार त्यांना मिळालेली मते व लाखो कार्यकर्त्यांचा संच त्यामुळे आमची बाजू भक्कम असून धनुष्यबाण कायद्याप्रमाणे आम्हालाच मिळेल असा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तारांनी हा दावा केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.