Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित जमातीसाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य – अर्ज करण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय योजनेंतर्गत वर्ष 2024-25 साठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85 टक्के व 100 टक्के अनुदानावर विविध प्रकारचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित जमातीतील बचत गट, शेतकरी, महिला आणि बेरोजगार युवक-युवतींना मिळणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या योजनेत ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी, विटभट्टी लावणे, बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा खरेदी, नैसर्गिक आपत्तीत वापरण्यासाठी रबरी बोट व इतर बचाव साहित्य खरेदी यासाठी अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच, सूक्ष्म व लघुउद्योजकांसाठी मिनी आटा चक्की, हळद-मसाला कांडप यंत्र व इतर छोटे उद्योग, मासोळी जाळी, औषध फवारणी पंप, काटेरी तार, सौर उर्जेवरील जाळी यासाठी देखील अनुदान उपलब्ध आहे. अनुसूचित जमातीतील महिलांसाठी टू-इन-वन शिलाई मशीन खरेदीसाठीही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण अर्ज प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे सादर करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या योजनेचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांची माहिती प्रकल्प कार्यालय, अहेरी येथील माहिती सुविधा केंद्रात तसेच जवळच्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.