Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी – मुख्यमंत्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, १३ एप्रिल: राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.  पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वाहतुकीत मोठा वेळ जात आहे. त्यासाठी लष्कराच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठीही पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

राज्यात कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे वैद्यकीय सुविधेवर भार पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  •  3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत
  • राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत. रोजी थांबली असली तरी रोटी थांबणार नाही.
  • राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत. रोजी थांबली असली तरी रोटी थांबणार नाही .
  • नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार
  • शिवभोजन थाळी १० रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर ५ रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत

राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी

  • उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी  राज्यात १४४ कलम लागू – पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी
  • अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.
  • कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.
  • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील
  • सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.
  • सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच असेल
  • औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरेंशी संबंधित दवाखाने उघडी राहतील
  • पत्रकारांनाही सूट असेल. पेट्रोल पंप सुरु राहतील
  • हे वगळता बंद राहील. बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका. थोडी वाहतूक सुरु ठेवत असाल तर बांधकाम उद्योग चालू ठेवू शकता.
  • हॉटेल रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु
  • रस्त्यावरील खाद्यपदार्थां सकाळी 7 ते राभी ८ पर्यंत सुरु राहील. गर्दी करु नये

Comments are closed.