Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील तिन्ही विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी १७ हजार जवान तैनात

आचारसंहिता दरम्यान पोलिसांनी ३८५ गुन्हाची नोंद करीत ४०० जणांना अटक करून दीड कोटींचे मुद्देमाल जप्त पोलीसांनी असून निवडणूक दरम्नयान क्षलवाद्यांच्या हालचालींवर १३० अत्याधुनिक 'ड्रोन'ची नजर,जावाना मार्फत ठेवण्यात येणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्हातील तिन्ही विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील सी-६० हे विशेष पथक सज्ज झाले आहे. एकीकडे प्रभावी नक्षलविरोधी मोहीम, दुसरीकडे आत्मसमर्पण यामुळे नक्षल चळवळीला एकामागून एक धक्के बसत आहेत. मात्र, निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार – होऊ नये, यासाठी नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिकअत्याधुनिक ‘ड्रोन कॅमेऱ्यां’ द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय लष्कराचे सात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असून मतदानाची वेळ सकाळी ७:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत राहणार आहे.

दारू माफियाना पोलिसांचा दणका ; दीड कोटी रुपयांचा मुद्द्देमाल जप्त..

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना आचारसंहिता कालावधीत मोठ्या प्रमाणात दारू सापडली असून पोलिसांनी ३८५ गुन्हे दारूचे नोंदविले आहे तर ४०० जणांना अटक केली आहे .सुमारे दीड कोटी रुपयांची दारू जप्त केली आहे. जिल्हाची भौगोलिक स्थिती परिस्थीती व जंगलव्याप्त दुर्गम ,अतिदुर्गम असल्याने यावेळी पथकांना कर्तव्य बजावतानाचांगलाच कस लागणार आहे. एकूण ९७२ पैकी तब्बल ४५८ मतदान केंद्रावर जाण्यासाठी पथकांना जंगलातून पायपीट करावी लागणार आहे. मतदान साहित्यसह सर्व जवानांच्यां सुरक्षा व्यवस्थेत मतदान केंद्रावर पोचविण्यात येणार आहे.या दरम्यान दोन रात्री जंगलातच कडाक्याच्या थंडीत मुक्काम करावा लागणार आहे. काही पथकांना २ ते ३ किमी तर काही पथकांना ३० ते ३४ किलोमीटर पायी जावे लागणार आहे. त्यामुळे पोलिंग बूथवर जाणाऱ्या पथकांना थंडीचा सामना करावा लागत असल्याने गरम कपडे ,टॉर्च ,औषधी व इतर मूलभूत साहित्य पुरविले जाणार असून मतदानाची वेळ सकाळी ७:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विधानसभा निवडणूक शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता गडचिरोली पोलीस दलाकडून व्यूहरचना आखली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर १४ ठिकाणी आंतरराज्य तपासणी नाके सुरू करण्यात आली असून, परराज्यातून येणाऱ्या व गडचिरोलीतून तिकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्हाभरात १७ हजार सुरक्षा जवानांची कुमक निवडणुकीसाठी तैनात राहणार आहे. कुठल्याही स्थितीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ७ हेलिकॉप्टरदेखील गडचिरोलीत  दाखल झाले आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणेकडूनही माहिती घेतली जात आहे. केंद्रीय सुरक्षा दलासह राज्याच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गडचिरोली पोलिसांकडून सतत आढावा घेतला जात आहे.

विधानसभा निवडणूक भयमुक्त  वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य ते उपाय केले आहेत. छत्तीसगडच्या सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गडचिरोली सीमेलगत असलेल्या राज्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कुठेही अनुश्यीत प्रकार घडू नये यासाठी  सी-६० या जवानांच्या विशेष पथका मार्फत नक्षलविरोधी अभियान राबवण्यात येत आहे. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा .

नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली,

 

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.