Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम, दि. २५ फेब्रुवारी: दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड  यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

कबिरदास महाराजांनी 21 तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. या संपूर्ण घटनेमुळे पोहरादेवी गर्दीतून कोरोना संक्रमणाची भीती व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोहरादेवी गर्दीबाबत कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. कोरोनाविषयक आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. कोविड काळात नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.