Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

एक लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 5 ऑक्टोंबर : गडचिरोली हद्दीतील मौजा दर्शनीमाल गावात 30/05/2018 रोजी फिर्यादी यांची पीडीत मुलगी ही आपले घरुन दुपारी 03.00 वाजताचे सुमारास घराशेजारी असलेल्या बाथरुममध्ये जाउन घरी येत असतांना, पीडीताचे आजोबा यांचे घराचे जवळ असलेल्या गोठयाचे  चाफ्यामध्ये  आरोपी नामे अनिल कवडु मशाखेत्री वय 40 वर्ष रा. दर्शनीमाल याने लपुन बसुन पीडीता अल्पवयीन असल्याचे माहीत असुन ती घराकडे परत जात असतांना, पीडीतेच्या जवळ येउन, हात पकडुन व एक हात तिचे तोंडावर दाबुन, ओढत-ओढत जवळ असलेल्या घराच्या धाब्यावर नेउन पीडीताचे अंगावरील कपडे काढुन जबरी अत्याचार केला. त्यामुळे पिडीता ही बेशुध्द पडल्याने, आरोपीने तीला गोट्जयावळ असलेल्या संडासमध्ये डांबुन ठेवले.

पीडीता ही घरी न आल्याने फिर्यादीने गावात व इतरत्र पीडीतेचा शोध घेतला असता मिळुन आली नाही. रात्रो अंदाजे 08.30 वा. दरम्यान फिर्यादीचा लहान मुलगा हा सायकल ठेवण्यासाठी घराजवळ असलेल्या गोट्जया मध्ये गेला असता. गोट्जयावळ असलेल्या संडासमध्ये त्याला पीडीतेची पांढ-या रंगाची ओढनी दरवाज्यातुन बाहेर दिसली. सदर बाब ही फिर्यादीला सांगताच तिथे फिर्यादीने जावुन पाहीले असता पीडीता ही बेशुध्द झालेल्या अवस्थेत मिळाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन गडचिरोली येथे दि. 31/05/2018 ला गुन्हा दाखल करुन आरोपीस
 अटक करुन, तपास पुर्ण करुन कलम 4 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, मध्ये दोषी ठरवुन 20 वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कलम 3 अनुसुचित जाती जमाती कायदायान्वये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://youtu.be/uYC5UozLG5w

Comments are closed.