Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन्न प्रक्रिया उद्योगांत ३३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १६ डिसेंबर : देशात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या खूप संधी असून भारताचा अन्न व किराणा बाजार जगभरात सहाव्या क्रमांकावर आहे. आगामी २०२४ पर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये ३३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा विश्वास राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

अ‍ग्रोव्हिजनच्या वतीने अन्न प्रक्रियेवर आयोजित एका चर्चासत्रात ना. गडकरी बोलत होते. यावेळी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, अ‍ॅग्रोव्हिजनचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संघटन सचिव रमेश मानकर, संयोजक रवी बोरटकर, विनीत अग्रवाल, दीपक सूद आदी  ऑनलाईन उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 ना. गडकरी म्हणाले की, शासनाने मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत ३७ फूड पार्क मंजूर केले असून यापैकी २० पार्कचे काम सुरु झाले आहे. येत्या २०३० पर्यंत खाद्य वस्तूची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून भारत विश्वातील पाचवा सर्वात मोठा उपभोक्ता होईल. या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता शासनाने या क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. देशात लहान व अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे हे शेतकरी आपले उत्पादन बाजारापर्यंत नेहमी नेऊ शकत नसल्यामुळे, ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठ़ी शेतकर्‍यांच्या कंपन्या बनविण्यात याव्यात. या कंपन्या खाद्यान्न प्रक्रिया व मार्केटिंगही करू शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत १ लाख कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. या निधीमुळे शेतकरी उत्पादन आणि मार्केटिंगचा लाभ घेऊ शकतात. विदर्भातील दूध उत्पादक शेतकर्‍याचे दूध अधिक भावात घेण्यासाठी मदर डेअरीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचेही ना. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.