Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 14 ऑगस्ट 2023 : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” जाहीर झाले आहे.

संपूर्ण देशभरात एकुण 229 पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 33 पोलीस शौर्य पदक ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 29 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. असे मिळुन यावर्षी एकुन 62 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त प्राप्त झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार

 1) सपोनि. रोहीत फारणे, 2) सपोनि. भास्कर कांबळे, 3) सपोनि. कृष्णा काटे, 4) पोउपनि. बाळासाहेब जाधव, 5) पोउपनि. सतीश पाटील, 6) सफौ./2628 सुरपत वड्डे (1द्मद्य एॠङ च्र्ग्र् घ्ग्क्र), 7) सफौ./1399 मसरु कोरेटी, 8) पोहवा/1387 दृगसाय नरोटे, 9) पोहवा/2474 संजय वाचामी, 10) पोहवा/3038 गौतम कांबळे, 11) पोहवा/665 मोरेश्वर पुराम, 12) पोहवा/1531 मुकेश उसेंडी, 13) पोनाअं/3249 विनोद डोकरमारे, 14) पोनाअं/1942 कमलाकर घोडाम, 15) पोनाअं/1784 देविदास हलामी, 16) पोनाअं/5650 महारु कुळमेथे, 17) पोनाअं/1272 चंद्रकांत ऊईके, 18) पोनाअं/6068 पोदा आत्राम, 19) पोनाअं/1456 किरण हिचामी, 20) पोअं/3566 दयाराम वाळवे, 21) पोअं/5264 प्रविण झोडे, 22) पोअं/3539 दिपक मडावी, 23) पोअं/5368 रामलाल कोरेटी, 24) पोअं/3810 हेमंत कोडाप, 25) 3931 वारलु आत्राम, 26) पोअं/5230 माधव तिम्मा, 27) पोअं/5700 नरेश सिडाम, 28) पोअं/5907 रोहिदास कुसनाके, 29) पोअं/3602 नितेश दाणे, 30) पोअं/5236 कैलास कुळमेथे, 31) पोअं/4080 प्रशांत बिटपल्लीवार, 32) पोअं/749 मुकुंद राठोड, 33) पोअं/5535 नागेश पाल यांना पदक मिळाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा मर्दीनटोला येथे झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.