Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री पिक विम्याची ४.८९ लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

एकुण मंजूर ४५१.३९ लाख शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे काम सुरू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. १२ नोव्हेंबर: प्रधानमंत्री पिक विमा योजना  सन २०२०-२१ अंतर्गत दिनांक २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान च्या कालावधी मध्ये निर्माण झालेल्या पुरपरिस्थीतीमुळे भात व कापुस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.  सदर झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने सुरुवात केलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२८-३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी हंगामातील प्रतिकुल परि‍स्थिीतीत झालेल्या नुकसान (mid-Adversity) या मथड्याखाली १९ महसूल मंडळातील १३२५० शेतकऱ्यांना ४५१.३९ लाख तर स्थानिक आपत्ती  (Localized Claim) या मथड्याखाली ४२० शेतकऱ्यांना ३८.५५ लाख रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. करिता मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व शेतकरी बंधुभगिनीचे अभिनंदन करुन तसेच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होऊन सदर योजनेस उत्स्फृत प्रतिसाद देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.