दुर्गम भागातील ८०० रुग्णांना मिळाली दूरदृष्टी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या २३० गावात सर्चच्या फिरत्या रुग्णालयामार्फत डोळ्याची तपासणी करण्यात येते. ज्या रुग्णांची नजर कमजोर असते, अशा रुग्णांना चष्मे देण्यात येतात. आतापर्यंत ८०० पेशंटला दूरदृष्टी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केला आहे.
आदिवासी भागातील लोकांना फिरता दवाखाना मार्फत डोळ्याची तपासणी करून गरजू लोकांना गावामध्येच चष्मे वाटप करण्यात येते. मोतीबिंदू असलेल्या रुग्णाची तपासणी करून ज्या पेशंटला मोतीबिंदू आहे, अशा पेशंटचे निदान करून सर्चमार्फत त्यांचे मोफत ऑपरेशन केल्या जाते. आतापर्यंत महात्मे हॉस्पिटल नागपूर व मेयो हॉस्पिटल नागपूर येथे ११० पेशंटची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडली.
दुर्गम भागातील लोकांना रुग्णालयात जाऊन डोळ्यांची तपासणी करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने सर्चच्या वतीने सुरु असलेले फिरते रुग्णालय रुग्णांपर्यंत जाऊन त्यांना सेवा प्रदान करीत आहे. या टीमच्या माध्यमातून डोळ्यांची रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार दिले जाते. ज्या रुग्णांना वाचन करण्यात व दूरचे दिसण्यात अडचण आहे, अशा पेशंटची तपासणी करून चष्मे सुद्धा देण्यात येतात. आतापर्यंत ८०० पेशंटला चष्मे देण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, दर महिन्यात १०० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुर्गम भागातील रुग्णांना सोयीस्कर उपचार घेऊन दूरदृष्टी मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे.
Comments are closed.