Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बसच्या केबिनला लागली आग, नागरिकांच्या मदतीने प्रवाशांनी खिडकीतून घेतली उडी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 10 एप्रिल :-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात एसटी बसच्या केबिन मधील बॅटरीच्या वायरिंगने पेट घेतला. हळूहळू आग वाढत असतानाच नागरिकांच्या सतर्कतेने तात्काळ आग विझविण्यात आली. बस मध्ये महिला प्रवासांची गर्दी भरपूर प्रमाणात होती. आग लागली असताच प्रवाशांनी खिडकीतून व मागील दारातून उडी घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आग विझल्याने अनर्थ टळला आहे.धूर निघाल्याचे दिसताच चालक, वाहक, बस मधील प्रवाशांचे मदतीला नागरिकांनी धाव घेतली. बसचे केबिन मध्ये आग पाण्याने विझविण्याकरिता मिळेल ती नागरिकांनी मदत केली. स्थानीकांनी बॅटरीचे वायर व लॉक तोडले आणि आग आटोक्यात आणली. बस मधील प्रवाशांनी  खिडकी व मागील आपत्कालीन दरवाजा चे वापर करून उडी घेतली. या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.