Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर – मादी बिबट गावात आली. तिने गावातील एका घरात आश्रय घेतला आणि तिथेच प्रसूत झाली. तीन बछड्यांना जन्म दिला. ही बाब ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड तालुक्‍यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू होता. या कालावधीत बिबट्याने गावात येऊन काही गावकऱ्यांची बकऱ्या, गायी आणि बैल ठार केले होते.

वाघ आणि बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले होते. सोमवारी सकाळीच बिबट एका घरातून बाहेर पडताना एका व्यक्‍तीस दिसला. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.गावकऱ्यांनी घरात येऊन पाहणी केली असता घराच्या एका कोपऱ्यात तीन बछडे दिसून आले.गावकऱ्यांनी लगेच ही माहिती वनविभागास दिली. वनविभागाचे अधिकारी बाळापूर येथे दाखल झाले ज्या घरात बिबटची प्रसूत झाली त्या घरात कोणीही राहत नव्हते.परंतु बिबट्या आपल्या पिल्यांसाठी पुन्हा धुमाकूळ करू शकतो त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.