Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील नेकनूर जवळ घडली घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड, 7 जुलै – पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी निघालेले दिंद्रुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्रीधर नन्नवरे यांचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज रविवारी दि.०7 सकाळी 7 च्या सुमारास नेकनूर जवळ झाला असून घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय महामार्ग ५४८ वरून आज सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकी (एम.एच २३ ए. के. ९३९७) वरून जात होते. यावेळी स्विफ्ट कर (एम.एच.२३ बी.सी.२१०८) ने धडक दिल्याने यात श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यु झाला तर नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळावरून कार चालकाने पळ काढला असून घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.