Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याहेतू आढावा बैठक सपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता दि,23 ऑगस्ट  रोजी डॉ.अजयभाऊ पाटील , केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर,शाखा गडचिरोली यांचे नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांच्या दालनात सभा आयोजीत करण्यात आली होती . क्षेत्रीय कर्मचा – यांच्या तक्रारीबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक,गडचिरोली  अस. रमेशकुमार यांनी संघटनेला आस्वाशीत करून बैठकीत समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .

गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या ह्या समस्या आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये  वनविभागातील कर्मचा – यांना विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व 15 टक्के प्रोत्साहन भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा .
2 . बक्षी समितीचा खंड 2 लागू करण्यात यावा .3. महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली 2021 लागू करण्यात यावी . 4. विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढण्यात यावे . 5. कर्मचा – यांचे सेवा पुस्तके अदयावत करण्यात यावे . 6. नियतक्षेत्रांचे पुर्नगठन करण्यात यावे . 7. वनरक्षक व वनपाल यांना मदतनिस देण्यात यावे . 8. सिरोंचा वनविभागातील कर्मचा – यांच्या वैदयकीय बिले मंजुर करण्यात यावे . 9. संगणक चालक यांचे पि.सी.सी. एफ कार्यालयातील ऑपरेटर प्रमाणे वेतन देण्यात यावे . 10. वनविभागातील वनवसाहत येथील इमारतीचे दुरूस्ती करण्याबाबत . 11. वन्यप्राणी व वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करणेबाबत . 12 वनमजूरांची सेवाजेष्ठता प्रकाशीत करणेबाबत . इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली .

आयोजित सभेला वनवृत्त अध्यक्ष सिध्दार्थ मेश्राम , केंद्रीय संघटक , पुनम बध्दावार , भारत साबळे , सुनिल पेंदोरकर , किशोर सोनटक्के , सुबिनय सरकार , ईश्वर मांडवकर , अनंत ठाकरे , रूपेश मेश्राम , रवि जुवारे , नितेश तुमपल्लीवार , विकास शिवणकर व संघटनेचे पदाधिकारी , वनपाल , वनरक्षक , वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.