ट्रक ची तपासणी करीत असलेल्या पोलीस वाहनाला भरधाव ट्रकची धडक दोघांचा मृत्यू
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नांदेड,1ऑगस्ट 2023 ; नांदेड जिल्ह्यातील माहूर पासून १५ किमी. अंतरावर असलेल्या पोलीस मदत केंन्द्र कोसदणी जि. यवतमाळ येथील कर्तव्यावर असलेले तिन कर्मचारी दि.२९ जुलैच्या रात्रीला ११ ते ११.३० च्या दरम्यान नागपुर ते तुळजापुर महामार्गावर शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना कोसदणी गावाच्या नाल्याजवळ एक आयशर ट्रकची तपासणी करत असतांना भरधाव वेगाने येणा-या दुसरे आयशर ट्रक ने पोलीस वाहनाला धडक दिल्याने एक कर्मचारी व ट्रक चालक जागीच ठार झाल्याची विचित्र घटना घडली आहे.
नागपुर तुळजापुर माहामार्गावर उमरखेड (कोसदणी) ता,आर्णी येथे पोलीस मदत केंद्र असुंन ०३ अधिकारी व १६ पोलीस अमलदार नियुक्त आहेत शनिवार दि. २९ जुलै रोजी रात्री ११.३० वा नेहमीप्रमाने शासकीय वाहन क्र, एम एच १२ आर टी ९६११ ईर्टीका पोलीस व्हॉनने संजय नेटके, संतोष हराळ, व चालक कुणाल साळवे. हे पेट्रोलींग करत होते. त्याना कोसदणी गावा जवळील पुलावर यवतमाळ कडे जाणारा आयशर क्र,एम,एच १३ सीयु ४९८२ हे उभा दिसला असता त्यांनी आयशर चालकास वाहनाखाली बोलावुन विचारपुस करीत असतांना पुन्हा एक भरधाव आयशर ट्रक क्र,युपी ६३ बीटी ९१२७ पोलीस पेट्रोलींग वाहनावर आदळल्याने महामार्ग पोलीसांचे तपासणी वाहन दोन्ही ट्रकच्या वाहनाच्या मधे सापडुन सदर पेट्रोलींग वाहन चपटे झाले पेट्रोलींग वाहनाच्या समोर असलेले पोना संजय नेटके वय ४१ बन २२३१ रा,पुसद व उभा असलेल्या आयशर चा चालक पांडुरंग हरी नखाते रा,मगरवाडी ता, पंढरपुर वय ५० वर्ष हे दोघे जन जागीच ठार झाले. तर बाजुला उभे असलेले पोलीस कर्मचारी संतोष हराळ वय ३९ वर्ष व कुणाल सावळे वय ४१ वर्ष हे दोन कर्मचारी गंभीर जख्मी झाले.
Comments are closed.