Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूमुक्त होण्यासाठी तालुका क्लिनिकचा आधार

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यातील दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी मुक्तिपथतर्फे आयोजित तालुका क्लिनिक लाभदायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनापासून सुटले आहेत. मागील आठवड्यात विविध तालुक्यातील ४५ रुग्णांनी तालुका क्लिनिकचा आधार घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना तालुका मुख्यालयी उपचार घेणे सोयीस्कर ठरावे, यासाठी मुक्तिपथ तर्फे बाराही तालुका मुख्यालयी व्यसन उपचार तालुका क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनापासून मुक्त झाले आहेत. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशक व मार्गदर्शक दारूच्या व्यसनाचे गांभीर्य समजावून सांगतात. दारूचे व्यसन सोडण्यासाठी करावयाच्या उपायोजना समजावून सांगतात. सोबतच औधोपचार देखील करतात. एवढेच नव्हे तर एकदा क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करून रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली जात आहे. यामुळे रुग्णांना दारूचे व्यसन सोडण्यासाठी मदत मिळत आहे. मागील आठवड्यात गडचिरोली तालुका क्लिनिकमध्ये एकूण १७ रुग्णांनी भेट दिली. एटापल्ली ५, देसाईगंज ८, सिरोंचा ८ तसेच चामोर्शी तालुका क्लिनिकमध्ये ७ अशा एकूण ४५ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निश्चय केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Leave A Reply

Your email address will not be published.