Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब… चंद्रपूर मनपाकडे कोविड रुग्णालयातील जेवणाच्या डब्ब्याचे १ कोटीच्या वर बिल थकीत!

  • चंद्रपूर मनपाने २४ तासाच्या आत जेवणाचे थकीत बिल दिले नाहीतर यापुढे जेवणाचे डब्बे बंद करू : भोजन पुरवठा करणार्‍या कंत्राटदारानी दिला इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १३ एप्रिल: राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहेत. अशातच चंद्रपूर मनपाच्या कोविड रुग्णालयात आधीच कोरोना बाधित असलेले रुग्ण आपल्या जिवाची भीती घेऊन जगत आहेत. मात्र त्या रुग्णांवर आता उपासमारीने जीव जाण्याची टांगती तलवार असल्याचे उघड झाले असुन चंद्रपूर मनपाने २४ तासाच्या आत जेवणाचे थकित देयके दिली नाहीत तर ह्यापुढे कोविड रुग्णालयातील जेवणाचे डबे बंद करू. असा निर्वाणीचा इशारा भोजन पुरवठा करणार्‍या कंत्राटदाराने मनपा प्रशासनाला एका पत्राद्वारे दिल्याने खळबळ माजली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सविस्तर वृत्त असे की, कोरोना संकट सुरू झाल्यापासून चंद्रपूर येथिल कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी रॉयल ऑर्चिड ह्या संस्थेला सुरुवातीपासून भोजन पुरवठा करण्याचे कंत्राट मनपा चंद्रपूर तर्फे देण्यात आले आहे. परंतु मागील नोव्हेंबर महिन्यापासून सदर कंत्राटदाराचे भोजनाचे देयके थकित असल्याने नाईलाज म्हणुन ह्यापुढे आपण जेवण पुरवठा करू शकणार नाही असे सांगुन २४ तासाच्या आत मनपाने थकित बिलाची रक्कम दिली नाही तर आपण जेवणाच्या डब्याचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरू आणि त्यामुळे रुग्णांना होणारा भोजन पुरवठा नाईलाजाने थांबवावा लागेल असा निर्वाणीचा इशारा मनपाला पत्राद्वारे दिला आहे.

मागील नोव्हेंबर पासुन थकित असलेल्या बिलाची रक्कम १ कोटी रुपयांच्या वर गेली असुन  उधारीवर अन्नधान्य सुद्धा मिळणे बंद होत असल्यामुळे जर आपल्याला तत्काळ देयके मंजुर करून दिली नाही तर भोजन व्यवस्था बंद करू असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.