Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती

:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होणार सुनावणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी :  सत्ताधारी गट व काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सहा नगरसेवक अशा एकूण आठ जणांना  तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २३ डिसेंबर रोजी अपात्र ठरवले होते. परंतु नगर विकास मंत्रालयाने त्यास स्थगीती दिलेली आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये अहेरी नगरपंचायतचे  सभागृहात  सर्वसाधारण सभा पार पडली, त्यामध्ये  वॉर्ड क्र. १० मध्ये अजय कंकडालवार यांनी नगर भूमापन क्र. ७८० व ७६६ मध्ये सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला  होता. त्या  बांधकामास सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी सभेत समर्थन दिले व  तसा ठरावही पारित केला. त्यावर भाजपच्या वॉर्ड क्र. १५ मधील नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवून त्यायात कंकडालवार यांनी विनापरवाना, तसेच अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २३ डिसेंबर रोजी अजय कंकडालवार यांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा ठपका ठेऊन अहेरी नगरपंचायतीतील नगराध्यक्षा रोजा करपेत, उपनगराध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नौरास रियाज शेख, मीना ऑडरे, नगरसेवक विलास गलबले, विलास सिडाम, महेश बाकेवार यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून  अपात्र घोषित केले होते. त्यावर  नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी याबाबत नगरविकास विभागाकडे अपिल दाखल केले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने अपिल दाखल करून घेत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ७ जानेवारी रोजी स्थगिती दिलेली असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सहा नगरसेवक यांना सध्या  दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

*ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*

वनविभागाने दोन वर्षांची मजुरी थकवली,असतानाही (म.ग्रा.रो.ह.यो) अंतर्गत नवीन कामांचा आग्रह !

अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न

 

 

Comments are closed.