Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चाहत्यांच्या गर्दीतून राणी रुक्मिणी देवींना शुभेच्छांचा वर्षाव

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

अहेरी, 26 सप्टेंबर : अहेरी इस्टेटच्या राजमाता, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा विदर्भातील नामांकित धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा राणी रुक्मिणी देवी यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्थांची तथा पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वार्डा- वार्डातील महिलांनी पुष्पगुच्छ व भेट देऊन राजमालाच्या प्रांगणात शुभेछ्याचा वर्षाव केला.

राजमालाच्या प्रांगणात आयोजित वाढदिवस कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र माजी राज्यमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा, राजमाताच्या लहान बहीण राजकुमारी विजयश्री सिंग , प्रवीणराव बाबा, चित्तेश्‍वर बाबा, विकी बाबा, वैभव सोमकुवर यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी राज घराण्याशी संबंधित निष्ठावंत प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल, प्राचार्य मारोती टिपले, संतोष उरेते, गिरीश मद्देरलावार, प्राचार्य अनिल भोंगळे, प्राचार्य संजय कोडेलवर, सेवानिवृत्त प्राचार्य विजय खोंडे,प्राचार्य अरुण गोटेफोडे, प्राचार्य तग्रे, मुख्याध्यापक तालिब सय्यद,मुख्याध्यापक अनिल यावले, मुख्याध्यापक वांढरे , मुख्याध्यापक दीपक राय व दिलीप राय, मुख्याध्यापक प्रभाकर भुते, मुख्या . उराडे, प्रा रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे,प्रा. अतुल खोब्रागडे, प्रा गोंडे , पर्यवेक्षक युवराज करडे, पर्यवेक्षक हंसराज खोब्रागडे,आदर्श राज्यस्तरीय शिक्षिका जयश्री विजय खोंडे,प्रमोद दोनतूलवार, यांच्या नेतृत्वातील स्थानिक व्यापारी संघटनेतील इतर सदस्यगण, प्रकाश गुडेलीवार, भाजपाध्यक्ष रवी नेलकुद्री, अमोल गुदेलीवार, शंकर मगडीवार ,संतोष मद्दीवार, विनोद जल्लेवार, विकास तोडसाम, नगरसेवक विकास उईके , माजी नगरपंचायत अध्यक्ष हर्षताई रवींद्र ठाकरे, नगरसेविका शालिनी पोहणेकर, चाणक्य व लक्ष्य अकाडमीचे विद्यार्थी , नगरपंचायतचे आजी-माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली तथा पाचही तालुक्यातील आलेले पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज घराण्याकडून आलेल्या शुभचिंतकांसाठी हिंगणघाट येथील डोंगरे यांच्या भक्तीगीत पर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच समस्त राज घराण्यातील “अहेरीचा राजा” गणेश मंडळाला भेट देणाऱ्या भक्तांसाठी व शुभेच्छांसाठी महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. राजमाता राणी रुक्मिणी देवी यांनी सर्व आप्तेष्टांच्या शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून असेच प्रेम राजघराण्याशी ठेवण्याचे आवाहन करून सर्वांना धन्यवाद दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.