लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 6 एप्रिल :- भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस राजवाडा अहेरी येथील समोरील जनसंपर्क कार्यालयात ध्वज फडकवून माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अंब्रिशराव यांच्या हस्ते फडकविण्यात आला. तसेच अहेरी ते आलापल्ली पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आली. राजवाडा रोड, दानशूर चौक, गांधी चौकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र असलेल्या गाडीवरून गौरव यात्रा अलापलीच्या गांधी चौकापर्यंत नेण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल समाज माध्यमात वारंवार चुकीची माहिती व टिप्पणी करून सावरकरांचा अपमान केला जात आहे. याच्या निषेधार्थ भाजपा शिवसेना महायुती सरकारच्या वतीने गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे राजे अमब्रिराव यांनी म्हटले. राजे साहेबांसोबत प्रकाश गुडेलिवर, प्राचार्य मंडल, संजय कोडेलवर, संतोष उरेते, प्रा अनील भोंगळे, धीरज महंत होते. यावेळी तालुका भाजपा प्रभारी विनोद अकंपलीवार रमेश समुद्रालवार, रवी नेलकुद्री अमोल गुडेलीवार , संतोष मद्दिवर , शंकर मगडीवार, नगरपंचायतीचे पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने गौरव यात्रेत सहभागी झाले होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.