Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय आदिवासी वसतिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे – आमदार डॉ. देवराव होळी

  • आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ मार्च २०२१:  गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज येथील आ. डॉ देवरावजी होळी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या व येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सोबत संवाद साधला.    

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येथे नव्याने निर्माण होत असलेल्या दोन अद्यावत मुला मुलींचे वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी बोलतांना आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सांगितले शासकीय वसतिगृहातील समस्त विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना राज्य सरकारच्या सर्व सोयसुविधा लाभ देण्यात यावे व शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हेळसांड खपवून घेणार नाही असा इशारा दिला. यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास पाटील दशमुखे, पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, मालता ताई मडावी भाजपा गड, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, मुख्याध्यापक ब्राम्हणकर, शिक्षक सुधीर शेंडे शिक्षक नैताम, एस आर मंडलवार, अधीक्षक एस.आर.जाधव, प्र. अधिक्षिका बी. डी. वाळके, शिक्षक व्ही. एस. देसू व कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.