Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन

  • सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रूग्णालयात रूपांतर करण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. २२ एप्रिल: तालुक्यातील सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रुग्णालयात तात्काळ रुपांतर करुन त्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा करण्याची मागणी सर्व पक्ष तालुका विकास आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारामार्फत राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरची तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर साठी बरेच पेशंट  गडचिरोलीला रेफर केले जात आहेत. पण गडचिरोली च्या रुग्णालयात बेड उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागते. त्याकरिता कोरची येथील सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रुग्णालयात रुपांतर करुन १० वेंटीलेटर व ४० ऑक्सीजन बेडची व्यवस्था असलेला कोवीड सेंटर तयार करणे खूप गरजेचे आहे, कोरची वरुन गडचिरोली चे अंतर हे १२० किमी आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गडचिरोलीला जाऊन उपचार करणे खूप अवघड होत आहे.

नविन रुग्णालय तयार करण्याकरीता लागणारा निधी तालुक्यातील २९ ग्रामपंचायत व १ नगरपंचायत मध्ये असलेल्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी व आमदार व खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून खर्च करणे तसेच तालुक्यातील विविध  सामाजिक कार्यकर्ते इच्छा शक्ती दान करण्याची तयारी दाखवली आहे. तरी कोरची येथील सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रुग्णालयात तात्काळ रुपांतर करण्यासाठी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजभे, जिल्हाधिकारी दिपक सिगंला, मुख्य कार्यकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष शामलाल मडावी, सचिव नंदकिशोर वैरागडे, उपाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, सहसचिव आनंद चौबे, कोषाध्यक्ष मनोज अग्रवाल, श्रावण मातलाम सभापती प स कोरची, शिवसेना तालुका पक्षप्रमुख रमेश मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताबसिंग गजभिये, सुशीला जमकातन उपसभापती, हेमंत मानकर अध्यक्ष सरपंच संघटना, झाडूराम सलामे अध्यक्ष महा ग्रामसभा, अशोक गावतुरे, डॉ शैलेंद्र बिसेन, सियाराम हलामी,प्रा देवराव गजभिये, सदरुददीन भामानी राजेश नैताम, सूरेश काटेंगे, रामकुमार नाईक पत्रकार शालीकराम कराडे, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, आदी उपस्थित होते.

Comments are closed.